राजकीय फायद्यासाठी जात जनगणना नको - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 September 2024

राजकीय फायद्यासाठी जात जनगणना नको - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


मुंबई - केवळ निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये. हिंदू धर्मात जात ही संवेदनशील बाब आहे. याचा निवडणुकीच्या पलीकडे विचार व्हायला हवा. कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जात जनगणना झाली पाहिजे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून जातीय जनगणेची मागणी होत आहे. काँग्रेसनेही जातीय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. यावर सुनील आंबेकर यांनी भाष्य केलं आहे.”जातीची जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. त्यावर पंचपरिवर्तनात चर्चा झाली. आम्ही मोठ्या प्रमाणावर समरसतेसाठी काम करू. आपल्या समाजात जातीच्या प्रतिक्रियांचा मुद्दा अत्यंत संवेदनशील  असून तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचाही आहे.  परंतु जात जनगणनेचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी आणि निवडणूक हेतूंसाठी न करता कल्याणकारी हेतूंसाठी आणि विशेषत: दलित समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रत्युत्तर - 
दरम्यान, सुनील आंबेकर यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने प्रतिक्रीया दिली आहे. आरएसएसने जात जनगणनेला उघड विरोध केला आहे. जात जनगणना समाजासाठी चांगली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या विधानावरून स्पष्ट होते की, भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही. ते दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत, पण जात जनगणना होईल आणि काँग्रेस करेल हे लिहून ठेवा.

काँग्रेस देशभरात जात जनगणनेची मागणी करत आहे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी SC, ST आणि OBC साठी 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडण्याचे आश्वासन दिले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad