नवी दिल्ली - काही संकेतस्थळ भारतीय नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्ड तपशीलांसह संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही संकेतस्थळे ब्लॉक करण्याची कारवाई तत्काळ करण्यात आली. भारत सरकार सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेटसाठी कटीबद्ध असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
भारत सरकारसाठी सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधारशी संबंधित कलम २९ (४) अंतर्गत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सरकारच्या वतीने माहिती तंत्रज्ञान सचिवांना माहितीच्या गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी तक्रार करणे आणि नुकसान भरपाई देण्याचे अधिकार दिले आहेत.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق