मुंबई - मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. तसं परिपत्रकही जारी केलं होतं. याविरोधात मुलींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता कपाळावर टिळा लावला म्हणून कॅालेजमध्ये प्रवेश नाकारता का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे ड्रेस कोड लागू करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. तसं परिपत्रकही जारी केलं होतं. याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला. मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती दिली.
कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॅालेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का ? असा सवालही सुप्रीम कोर्टाने या महाविद्यालयांना केला आहे. हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या या परिपत्रकावर कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून कोर्टाने सविस्तर उत्तर मागवले आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासन याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान हिजाबबंदीवर पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
मुलींच्या पेहरावावर बंदी घालून तुम्ही कोणती सशक्तीकरण करत आहात ? मुलींना कोणते कपडे घालायचं हे त्यांच्यावर सोडले पाहिजे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मुलींच्या पोशाखावर अशी बंदी असल्याची चर्चा आहे हे दुर्दैव असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment