अणुस्कुरा घाटात दरड कोसळुन वाहतुक ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2024

अणुस्कुरा घाटात दरड कोसळुन वाहतुक ठप्प


रत्नागिरी / राजापूर - दरड कोसळण्याचा धोका असलेल्या अणूस्कुरा घाटामध्ये शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास दरड कोसळली असून घाट रस्ता बंद पडलेला आहे त्यामुळे घाटातील  वाहतूक बंद होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ जेसीबींचे मशीन घाटात पाठवून रस्त्यावर आलेल्या मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. सायंकाळी उशिरापर्यंत अनुस्कुरा  घाट मार्गे वाहतूक पूर्ववत सुरू झाली नव्हती.

यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. शनिवारी पहाटे भला मोठा ढिगारा  रस्त्यावर येऊन कोसळला आणि अनुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प झाली. घाटात दरड कोसळल्याचे कळतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने  तात्काळ जेसीबी मशीन सह पडलेली माती उचलण्यासाठी काही डंपर पाठविण्यात आले. रस्त्यावर येऊन कोसळलेला मातीचा ढिगारा  मोठा असल्याने  दिवसभर तो दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते.रस्त्यावर कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यासह मोठमोठ्या दगडांचा समावेश असल्याने  सायंकाळी उशिरापर्यंत अनुस्कुरा घाटात कोसळलेली दरड दूर करण्यात यश आले नव्हते. अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद असून राजापूर आगारातून पुणे,कोल्हापूर,सांगली कडे जाणारी  व तिकडून येणारी एसटीची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली. घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच राजापूर तहसिलदारांसह पोलिस निरीक्षक यांनी यानी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली आणि संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. जून महिन्यात अनुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. त्यावेळी ही सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा घाटामध्ये दरड कोसळली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad