राजकारणाचा स्तर ढासळतोय - अजित पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2024

राजकारणाचा स्तर ढासळतोय - अजित पवार



मुंबई - राज्यात सध्या राजकारण तापले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपा-या फेकण्यात आल्या. त्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यात दिसले. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून मारण्यात आला. या वादावर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे.

राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कधीच मागे घडले नव्हते जे आता घडतेय. या अक्षरश: महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करणा-या गोष्टी आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत मांडले आहे.

खरंतर राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. या सगळ्या संदर्भात म्हणूनच मी ठरवलेलं आहे मी जन सन्मान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका. काय म्हणतोय मी, मी असे काय बोलतोय, मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय हे आपण सगळेजण बघताय. त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कधीच मागे घडले नव्हते जे आता घडतंय ते अक्षरश: महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करणा-या गोष्टी आहेत.

यातून सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी-विरोधी पक्षांनी सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, याबद्दल विचार केला पाहिजे आणि ज्या पक्षाच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांकडून चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्या पाहिजेत, असे आवाहन अजितदादांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे -
मराठा आरक्षणावर अजित दादांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आपले स्पष्ट मत असल्याचे अजितदादा म्हणाले. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad