सरकारने मुंबई विकायला काढली - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2024

सरकारने मुंबई विकायला काढली - उद्धव ठाकरे


मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आरसीएफ कर्मचारी सेनेच्या नूतन कार्यालयाचे उद्‍घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने मोक्याच्या जागा अदानींच्या घशात घातल्या आहेत. आता आरसीएफ देखील अदानींच्या घशात घालतील की काय, अशी स्थिती आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला हद्दपार करायचे सरकारने सुपारी घेतली आहे. मात्र शिवसेना असे होऊ देणार नाही. आता केवळ दोन ते तीन महिन्यांचा प्रश्न आहे. सरकारची ही अत्यंत घाणेरडी, व्यापारी वृत्ती आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की, गद्दारांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी गद्दारांना पन्नास खोके दिले गेले. मात्र लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपये दिले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले की, कोरोनाची लस तयार केली, त्यावर मोदींचा फोटो होता. खतांच्या गोणीवर देखील मोदींचा फोटो असतो. मग ही खते मोदींनी तयार केली का?

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad