मुंबई महापालिकेत १,८४६ पदांची भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2024

मुंबई महापालिकेत १,८४६ पदांची भरती


मुंबई - मुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहायक अर्थात लिपिक पदासाठी मेगाभरती निघाली आहे. तब्बल १८४६ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी सहायक या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवार दि. २० ऑगस्टपासून अर्ज करता येणार आहे. कार्यकारी सहायक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरु होईल. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ९ सप्टेंबर २०२४ असेल. 

मुंबई महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट क वर्गातील २५,५००-८११०० बेसिक असलेल्या कार्यकारी सहायक पदासाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूण १८४६ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १४२, अनुसूचित जमातींसाठी १५० जागा, विमुक्त जाती- (अ) ४९ जागा, भटक्या जमाती (ब) ५४ जागा, भटक्या जमाती (क) ३९ जागा, भटक्या जमाती (ड) ३८ जागा, विशेष मागास प्रवर्ग- ४६, इतर मागासवर्ग ४५२, ईडब्लूएस- १८५, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मगास- १८५ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०६ जागा रिक्त आहेत. याशिवाय समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.

https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक असून त्याद्वारे उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. दिनांक २० ऑगस्ट २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत अर्जाची मुदत असणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी आणि संभाव्य अडचणींसाठी ९५१३२५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान उमेदवारांना संपर्क साधता येणार आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad