लाडकी बहीण योजनेचे 'इतके' अर्ज बाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2024

लाडकी बहीण योजनेचे 'इतके' अर्ज बाद


मुंबई - लोकसभेत राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला अपयश आले. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अपयश येण्याची भीती असल्याने सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. मात्र अर्ज केलेल्या पैकी साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे. (Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana)

राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली आहे. तसेच अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरली आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार 235 अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. १७ ऑगस्टला पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेचा पहिला हफ्ता महिलांना देताना राज्य सरकारच्यावतीने भव्य कार्यक्रम घेतला जाणार आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad