मुंबई - मलेशियामधील कौलालंपर या शहरात दिनांक 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 च्या 6 वी हिरोस कप मलेशिया आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेत मुंबईतील जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत 4 सुवर्ण , 4 कांस्य आणि 5 रौप्य पदके जिंकली. अकॅडमीच्या या खेळाडूंच्या कामगिरीमुळे मलेशियात भारताचा तिरंगा डौलात फडकला. या आंतरराष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत जगभरातून 20 देशांच्या सुमारे तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या संघात तनिष्का वेल्हाळ, आर्या चव्हाण, आरव चव्हाण आणि सिनीअर वयोगटात विनीत सावंत, स्वप्निल शिंदे, यश दळवी यांचा समावेश होता. जयेश ट्रेनिंग तायक्वांदो अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी पदकांची कमाई केली. या स्पर्धेसाठी गेले 3 ते 4 महिने जयेश ट्रेनिंग तायक्वांदो अकादमीच्या जुहू विभागातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक यश दळवी, विक्रांत देसाई, स्वप्निल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू होता.
Post Top Ad
03 August 2024
मलेशिया आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.
No comments:
Post a Comment