मुंबई - एसटी कामगारांच्या प्रश्नावर काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री व उप मुख्यमंत्री अजित पवार पवार यांनी शांत बसले होते. काहीही बोलले नाहीत. मात्र सिन्नर येथे झालेल्या कामगार हितगुज मेळाव्यात मात्र कामगारांप्रती आदर व्यक्त करीत कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही आदर करतो.व त्यांना विनंती वजा आवाहन करतो की, एसटीचा कामगार सुद्धा एसटीचा कणा आहे. बहुतेक सर्व प्रश्न आर्थिक आहेत.व आपण अर्थ मंत्री असल्याने ते आपणच सोडऊ शकता त्या मुळे एसटी कामगारांच्या झोळीत सुद्धा काही टाकावे असे विनंती वजा आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले आहे.
एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन मिळण्यात अजून फक्त सात हजाराची तफावत आहे. राज्य सरकार सवलत मूल्य रक्कम दर महिन्याला वेतनासाठी देत आहे. त्यात अजून फक्त १६० कोटी रुपयांची भर सरकारने टाकली तर वेतनाचा प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो.त्याच प्रमाणे महागाई वाढली आहे. व ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या मुळे आमची मागणीही रास्त आहे.एसटी कर्मचाऱ्याची इतर कर्मचाऱ्यांशी तुलना केल्यास एसटी कर्मचारी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत.अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक,वृध्द, अपंग, दिव्यांग, महिला यांना सरकारने जाहीर केलेल्या सवलती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.किंबहुना सरकारचे दुत आहेत.अश्या कर्मचाऱ्यांशी सुध्दा हितगुज केली पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. असेही बरगे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment