मुंबई - मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडचे 91 टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024 ची मुदत देण्यात आली आहे. कंत्राटदाराने आणखी 181 दिवसाची मुदत मागितली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. त्यामुळे कोस्टल रोडचे 100 टक्के काम पूर्ण होण्यास 2025 उजाडणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे किनारा रस्ता प्रकल्प अंतर्गत प्रकल्प पूर्ण करण्याची मूळ तारीख आणि सद्यस्थितीची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेने अनिल गलगली यांस कळविले की भाग 4 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 25 मे 2023, 26नोव्हेंबर 2023 आणि 2 एप्रिल 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आजतागायत 91 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लार्सन अँड टूर्बो तर्फे 23 जुलै 2024 रोजी लेखी पत्र पाठवून 181 दिवसाची मुदतवाढ मागितली आहे. यात 8 कारणे सांगत मुदतवाढ मागितली आहे.
यापूर्वी भाग 1 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 12 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 9 जून 2023, 10 सप्टेंबर 2023 आणि 22 में 2025 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. भाग 2 चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख 15 ऑक्टोबर 2022 होती. या कामास 6 ऑक्टोबर 2023, 7 ऑक्टोबर 2023 आणि 25 ऑक्टोबर 2024 अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते 2025 पर्यंत काम पूर्ण होणार नाही. राज्य सरकारने निवडणूक लक्षात घेता घाईगडबडीत कामाचे उद्घाटन तोपर्यंत करु नये जोपर्यंत काम 100 टक्के पूर्ण होत नाही.
No comments:
Post a Comment