नवी दिल्ली - गेल्या जुलै महिन्यात अनेक अपघाताच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. रेल्वे अपघातांची मालिका अजुनही सुरूच आहे. अशावेळी सुरक्षिततेचा प्रश्न अनेकांच्या मनात उठतो. 2024 चे सात महिने उलटले असून आतापर्यंत 19 रेल्वे अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक रेल्वेच्या सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. एका रिपोर्टमधुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या महसुलात वाढ होऊनही ट्रॅकच्या देखभालीवर होणारा खर्च कमी झाला आहे.
जुलै महिन्यात चार रेल्वे अपघात झाले आहेत. बुधवारी (31 जुलै) ला पश्चिम बंगालमधील रंगपाणी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. 29 जुलै रोजी झारखंडमध्ये हावडा-मुंबई ट्रेन रुळावरून घसरली, दोन जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. 18 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली. यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हे अपघात सामान्यत खराब ट्रॅक, ऑपरेशनल चुका, जुनी सिग्नल यंत्रणा, हवामान इत्यादी कारणांमुळे होतात.
रेल्वे अपघाताची आकडेवारी -
राज्यसभेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की रेल्वे अपघातांमध्ये रुळावरून घसरणे हा सर्वात सामान्य अपघात आहे. 2021-22 मध्ये 27 अपघात, 2022-23 मध्ये 36 अपघातांची नोंद झाली आहे. बिझनेस लाइनच्या रिपोर्टनुसार, एकूण भांडवली खर्चात वाढ होऊनही, रेल्वे ट्रॅकच्या नूकणाकरणात वाटा कमी होत आहे. 2022-23 मध्ये रेल्वेचा महसूल ₹1.2 लाख कोटी आणि ट्रॅक सुरळीत करण्यासाठी 13.5 टक्के होता. आर्थिक वर्ष 24 मध्ये रेल्वेचा महसूल वाढून ₹1.5 लाख कोटी झाला, परंतु ट्रॅकवरील खर्च महसुलाच्या 11 टक्क्यांवर आला. गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार, आर्थिक वर्ष 25 मध्ये ट्रॅकवरील खर्च रेल्वेच्या महसुलाच्या 9.7 टक्क्यांवर घसरला आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता.‘रिपोर्ट ऑफ द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑन डिरेलमेंट’नुसार ट्रॅक नूतनीकरणातील गुंतवणूक कमी होत असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. यासाठी दिलेले बजेट पूर्णपणे वापरले गेलेले नाही. निधीचे वाटप न झाल्याने आणि निधीचा योग्य वापर न झाल्याने ट्रॅक नूतनीकरणाचे काम लांबणीवर पडत आहे. तसेच या घटनांसाठी 24 ट्रॅकची देखभाल, ट्रॅक पॅरामीटरच्या ठरलेल्या मर्यादा आणि कोच-वॅगन्समधील दोष ही काही प्रमुख कारणे आहेत.
No comments:
Post a Comment