जम्मू-काश्मिर - जम्मू-काश्मिरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय नेत्यांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय नेते पाकसमर्थित अतिरेक्यांचे सुलभ लक्ष्य राहत आले आहेत. मागील ३७ वर्षांत अतिरेक्यांनी १,२७१ नेत्यांची हत्या केली. यात गट स्तरावरील नेत्यांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच स्तरातील नेते आहेत.
१९८९ मध्ये काश्मिरात दहशतवादाचा उदय झाला, तेव्हापासून २००५ पर्यंतचा विचार केल्यास १९८९ आणि १९९३ ही २ वर्षे वगळता प्रत्येक वर्षी अतिरेक्यांनी राजकीय नेत्यांच्या हत्या केल्या. या कालावधीत ६७१ नेते अतिरेकी हल्ल्यांत मारले गेले. २००८ मध्ये लोकनियुक्त सरकार असतानाही अतिरेक्यांनी राजकीय नेत्यांवर १६ हल्ले केले. यातील अनेक हल्ल्यांत ते यशस्वी झाले. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने अतिरेकीही अड्ड्यांवरून बाहेर पडत आहेत.
राज्यातील राजकीय नेते पाकसमर्थित अतिरेक्यांचे सुलभ लक्ष्य राहत आले आहेत. त्यातच राज्यात दहशतवाद पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही प्रत्येक उमेदवारास सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. काश्मिरातील प्रत्येक निवडणुकीत पाकसमर्थित अतिरेक्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर हल्ले केले आहेत. इतकेच नव्हे, तर फुटीरवादी गटाच्या नेत्यांनाही त्यांनी सोडले नाही.
No comments:
Post a Comment