इच्छा मरण देणारे 'सुसाइड पॉड' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2024

इच्छा मरण देणारे 'सुसाइड पॉड'


बर्न - भारतात २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदविले होते. दरम्यान, न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटनुसार, स्वित्झर्लंडमध्ये एक सुसाइड पॉड वापरण्याची चर्चा सुरु झाली आहे. ज्याचे नाव सारको आहे, परंतु त्याला ‘टेस्ला ऑफ इच्छामरण’ म्हटले जात आहे.

जे लोक आजारपणाला कंटाळलेले असतात ते लोक देवाकडे इच्छामरण मागत असतात, अशा लोकांसाठी हे मशीन तयार करण्यात आले आहे. २०१९ मध्ये व्हेनिस डिझाइन फेस्टिव्हलमध्ये या मशीनचे पहिल्यांदा अनावरण करण्यात आले. हा थ्रीडी प्रिंटेड कॅप्सूलचा प्रकार आहे. या मशीनमध्ये बटन दाबताच आतील नायट्रोजनची पातळी झपाट्याने वाढते. अवघ्या ५ सेकंदात व्यक्ती ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेशुद्ध पडतो आणि १० मिनिटांतच त्याचा वेदनारहित मृत्यू होतो.

स्वित्झर्लंडची ‘द लास्ट रिसॉर्ट’ संस्था इच्छामरणाच्या बाजूने आवाज उठवत आहे. या पॉडपासून कोणतेही नुकसान होत नाही, आणि ते सहज वापरता येते, असा या संस्थेचा विश्वास आहे. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण कायदेशीर आहे, परंतु स्विस क्रिमिनल कोडच्या कलम ११५ मध्ये असे म्हटले आहे की, आत्महत्येस मदत करणे हा स्वार्थी कारणांसाठी केलेला गुन्हा आहे.

जन्मापेक्षा मृत्यू स्वस्त
ही सेवा लोकांना फक्त २० डॉलर्समध्ये, म्हणजे सुमारे १६०० रुपयांमध्ये दिली जाईल आणि ज्याचे किमान वय ५० वर्षे असेल. जर कोणी १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असेल आणि गंभीरपणे आजारी असेल, तर तो देखील ही सेवा वापरू शकतो. लास्ट रिसॉर्टचे मुख्य कार्यकारी सांगतात की, अनेकांनी या मशीनची मागणी केली आहे, त्यामुळे कदाचित लवकरच ते वापरले जाईल. 

हे मशीन केवळ खाजगी मालमत्तेवर, तसेच निर्जन ठिकाणी वापरले जाईल. अनेक लोक त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, कारण त्यांच्या मते हे मशीन नैतिकदृष्ट्या योग्य नाही. हे मशीन वापरताना डॉक्टरांची गरज नाही. अशा परिस्थितीत कोणीतरी जाणूनबुजून कोणाचा खून करू शकतो, असा प्रश्नही लोक उपस्थित करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad