मुंबई / नांदेड - उद्या (08 जुलै 2024) नांदेडमध्ये जरांगे यांची शांतता रॅली आणि जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील शाळांना सुट्टी (School) देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. त्यावरुन, आता वाद निर्माण झाला असून अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे.
मनोज जरांगे यांची उद्या नांदेडमध्ये जनजागृती यात्रा दुपारी 12 वाजता दाखल होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून नांदेड जिल्ह्यातील आजू बाजूच्या गावातील नागरिक उद्या नांदेड शहरात जरांगेंच्या सभेसाठी येणार आहेत. या रॅलीमुळे रस्त्याच्या वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे.
नांदेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने व गर्दी होणार आहे. त्यामुळे नांदेड शहरातील सर्व रस्ते उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 06 पर्यंत बंद आहेत, अशी अधिसूचना संदर्भ (2) अन्वये पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिली आहे.
गुणरत्न सदावर्तेंची तक्रार -
मनोज जरांगे हे नांदेड येथे 8 जुलै 2024 रोजी रॅली काढत असून सकल मराठा समाजाच्यावतीने शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी पारित केले आहेत. त्याविरोधात एडिशनशिप चीफ सेक्रेटरी शिक्षण विभाग, त्याचबरोबर विधानसभेच्या सभापती महोदयांना विनंती केलेली आहे, की तातडीने शैक्षणिक अधिकार हा संविधानिक आहे. अशा प्रकारचे शाळा बंद ठेवणे हे चुकीचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रॅली जर शिक्षणाला बाधक ठरत असेल तर ती रॅली थांबवण्यात यावी, असे निवेदन अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment