पोलिस उपनिरीक्षकाच्या मोटरसायकलीला कारने उडवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2024

पोलिस उपनिरीक्षकाच्या मोटरसायकलीला कारने उडवले



बीड - नेकनूरमधून बीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या मोटरसायकलीला भरधाव कारने उडवले. यामध्ये मच्छिंद्र नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात रविवारी (ता. ७) सकाळी पावणेसातच्या सुमारास येथील कांिलका मंगल कार्यालयाजवळ झाला. याबाबत अधिक माहिती अशी, नेकनूरचे रहिवासी व सध्या दिंद्रुड पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे व सिरसाळा पोलिस स्टेशनला पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश धोंडीराम नागरगोजे हे बीडमध्ये बंदोबस्तासाठी होते. शनिवारी हे दोघे ही नेकनूर येथे आले होते.

आज सकाळी बीडकडे बंदोबस्तासाठी आपल्या मोटरसायकलीवरुन (क्रमांक एमएच २३ एके ९३९७) निघाले होते. घरून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालिंका मंगल कार्यालयाजवळ पोहोचले असता, मांजरसुंबाकडून नेकनूरच्या दिशेने येणा-या भरधाव स्विफ्ट कारने (एमएच २३ बीसी २१०८) त्यांना रॉंग साईडला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही मोटरसायकलवरून खाली पडले व कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्यात पडली. यामध्ये मंिच्छद्र नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश नागरगोजे गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत नेकनूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास नेकनूर पोलिस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad