मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात रुग्णांच्या रिपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या पेपरच्या प्लेट बनवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांच्या रिपोर्ट कार्डच्या प्लेट्स नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थ देण्यासाठी या प्लेट्स वापरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रुग्णांच्या रिपोर्टसाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरच्या प्लेट बनवण्यात आल्या. या प्लेटचा वापर रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये केला जात होता. यातील काही प्लेट कचरा कुंडीत आढळून आल्या. या प्लेटवर रुग्णांची नाव असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. याप्रकरणी आज आमदार अजय चौधरी, मुंबईच्या माजी माहापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी प्रशासनाला या प्रकरणाबाबतचा जाब विचारला. ज्या लोकांना ऑफिसची माहिती नाही, त्यांना जबाबदारी नाही, अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे. महापालिकेचं वाटोळं करू नका. मुंबईत अरेरावी खपवून घेणार नाही, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. पालिकेचे अधिकारी सुधाकर शिंदे आल्यापासून मुंबईची वाट लावली आहे. आधी त्यांना हाकला. त्यांचं वय उलटून गेलं आहे. त्यांनाही वारंवार एक्स्टेनशन दिलं जात आहे. त्यांच्या मागे कोण आहे? कुणाच्या तरी आश्रयाने ते बसले आहेत. त्यांना आधी हद्दपार करा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.
डीन प्रेशरखाली -
डीन प्रेशरखाली आहे. त्या कोणतीही माहिती देत नाहीत. आम्ही सर्व माहिती काढली आहे. त्रुटी काय आहेत आणि कशाप्रकारची यंत्रणा राबवली जात आहे, हे आम्हाला माहीत आहे. स्टाफ तोंडातून शब्द काढत नाही. नर्सेसचं क्वॉर्टर तातडीने बांधण्यासाठी आमचे दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. पण डीन ऐकत नाही.
- अजय चौधरी, आमदार
No comments:
Post a Comment