मुंबईतील निवासी जागांच्या किमतीत २०.४% वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2024

मुंबईतील निवासी जागांच्या किमतीत २०.४% वाढ



मुंबई - मॅजिकब्रिक्सच्या ताज्या प्रॉपइंडेक्स अहवालानुसार (Magic bricks Survey) गेल्या दोन वर्षांत मुंबईतील निवासी जागांच्या किमती २०.४% वाढल्या आहेत. शाश्वत मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे ही वाढ झाली आहे. या अहवालानुसार, गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीत सरासरी निवासी दरात ६.५% वाढ होऊन तो रु.२६,७८०प्रति चौरस फूट इतका झाला आहे. यासह, मुंबई ही देशातील एक सर्वात लक्झरिअस बाजारपेठ झाली आहे.

पुढे जाऊन या अहवालात असेही म्हटले आहे की, मुंबईत बांधकामांतर्गत (अंडर-कन्स्ट्रक्शन) प्रॉपर्टीला असलेली मागणी वाढत आहे आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीमधील पुरवठ्यात १७% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीत बांधकामांतर्गत प्रॉपर्टीच्या किमतीत 13.02% वाढ होऊन ती रु.२७,४२२प्रति चौरस फूट इतकी झाली आहे.

या व्यतिरिक्त, निवासी मागणीमध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीत ६.७% वाढ झाली आहे. देशभरात गेल्या तिमाहीच्या तुलनेने या तिमाहीतील वाढ ४.०% इतकी आहे तर मुंबईतील पुरवठ्यामधील वाढ ५.३% इतकी आहे आणि राष्ट्रीय पातळीवरील वाढ ३.५% इतकी आहे. गेल्या २४ महिन्यांमधील ही सर्वाधिक वाढ आहे.

या अहवालात नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २ बीएचके युनिट्सना स्पष्ट प्राधान्य दिसून येत आहे. एकूण मागणीच्या ४३.५% मागणी २ बीएचके घरांसाठी आहे. ३ बीएचके घरांची किंमत रु.२८,९०० प्रति चौरस फूट इतकी आहे तर २ बीएचके घरांची किंमत रु.२१,८०० प्रति चौरस फूट इतकी आहे, अशी नोंद या पोर्टलने केली आहे.

या ट्रेंडबद्दल विस्तृत माहिती देताना हेड ऑफ रिसर्ज अभिषेक भद्र म्हणाले, "२०२४ मध्ये वाटचाल करत असताना भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठ आपल्या प्रगतीच्या सलग तिसऱ्या वर्षात मार्गक्रमण करत आहे. पुरवठ्यामध्ये सातत्यपूर्ण वाढ अपेक्षित असताना आणि वाढ कमी वेगाने व नियंत्रित असेल, असा अंदाज असताना बाजारपेठेत समतोल साधला जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बांधकामांतर्गत प्रॉपर्टीमध्ये ग्राहकांचा विश्वास वाढत असल्याने दीर्घकालीन विचार करताना निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेत आशादायक चित्र असेल, असे सूचित होत आहे.

या अहवालानुसार, मालाड-कांदिवली (रु.१८,८०० प्रति चौरस फूट इतकी सरासरी किंमत), अंधेरी पश्चिम - जोगेश्वरी पश्चिम (रु.२५,६०० प्रति चौरस फूट इतकी सरासरी किंमत) आणि बोरिवली दहिसर (रु.२०,८०० प्रति चौरस फूट इतकी सरासरी किंमत) ही मुंबईतील पश्चिम उपनगरे घरखरेदीदारांसाठी सर्वाधिक मागणी असलेली मायक्रो-मार्केट ठरली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad