रस्ते, पुलांवर होर्डींग लावण्यास पालिकेची बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2024

रस्ते, पुलांवर होर्डींग लावण्यास पालिकेची बंदी


मुंबई - घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा होर्डींगवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यापुढे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी शहरातील रस्ते आणि पुलांवर होर्डींग लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी लवकरच कठोर स्वरुपाची नियमावली जारी करण्यात येणार आहे.

पालिका प्रशासनाने आता यापुढे ४० फुट बाय ४० फुट याच आकाराचे होर्डींग लावण्यास परवानगी देण्याचे सक्त निर्देश मुंबईतील सर्व प्राधिकरणांना दिले आहेत. यापेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग लावता येणार नाही. त्याचप्रमाणे मुंबईतील मोठ्या रस्त्यांवर असणारे छोटे पूल आणि रस्त्यांवर मोठे होर्डींग्ज लावण्यास बंदी घातली जाणार आहे, तसेच खासगी कंपन्यांच्या वाहतूक टॅक्सीवरही चलचित्रे असलेल्या जाहिराती लावण्यावारही बंदी घातली जाणार आहे. घाटकोपरमधील छेडानगरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने अशी खबरदारीची उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad