राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या कमी झाली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2024

राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या कमी झाली



नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांची राज्यसभेतील ताकद कमी झाली आहे. खासदारांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी चार नामनिर्देशित सदस्य निवृत्त होत आहेत. हे चारही सदस्य भाजपच्या बाजूने राहिले आहेत. सध्या भाजपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ८६ आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची संख्या १०१ झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेस राज्यसभेत मजबूत होताना दिसत आहे. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. खासदार राकेश सिन्हा, राम सकल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी हे निवृत्त होत आहेत. राज्यसभेमध्ये सध्या एकूण २२६ खासदार आहेत आणि १९ जागा रिक्त आहेत.

काय होणार परिणाम?
येत्या बजेटमध्ये भाजपला अनेक विधेयकं मंजूर करून घ्यायचे आहेत. यासाठी भाजपला राज्यसभेतील ७ नामनिर्देशित सदस्य, २ अपक्ष, एआयएडीएमके आणि वायएसआरसीपी पक्षाच्या खासदारांवर अबलंबून राहावे लागणार आहे. दुस-यांवरचे अवलंबित्व कमी करणे आणि नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवणे यावर भाजपचा भर असणार आहे. या दृष्टीने भाजपने काम करणे गरजेचे बनले आहे.

राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्य नामनिर्देशित करत असतात. सध्या राज्यसभेमध्ये ७ नामनिर्देशित सदस्य आहेत. नामनिर्देशित सदस्य पक्ष निरपेक्ष असतात असा समज आहे. याशिवाय राज्यसभेतील १९ जागा रिक्त आहेत. यात चार नामनिर्देशित, चार जम्मू-काश्मीरमधून, तसेच बिहार, आसाम, महाराष्ट्रातून प्रत्येकी दोन आणि हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरातून १-१ खासदारांचा समावेश आहे. यातील १० जागा गेल्या महिन्यात रिक्त झाल्या आहेत. कारण, काही खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत.

येत्या काळात ११ रिक्त जागांपैकी ८ जागा भाजपला मिळू शकतात. इंडिया आघाडीच्या पदरात ३ जागा पडू शकतात. तेलगंणातून काँग्रेसला एक जागा मिळू शकते. असं झाल्यास काँग्रेस राज्यसभेतील एकूण संख्याबळ २७ वर जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad