अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2024

अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय



मुंबई- मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण मतदारसंघ या चार मतदारसंघातील मतमोजणी आज सुरु आहे. यामध्ये पहिला निकाल हाती आला असून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात बाजी मारली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदासंघात २५००० मतांनी विजय मिळवून गेल्या ३० वर्षांपासूनचा आपला गड राखला आहे.

अनिल परबांनी राखला शिवसेना ठाकरे गटाचा गड - 
मुंबई पदवीधर मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद राहिलेला हा मतदारसंघ राखण्याचं आव्हान त्यांच्यापुढं होतं. या मतदारसंघात दीड लाखाच्या आसपास मतदार आहेत. यंदा मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या वतीनं अॅड. अनिल परब निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्याचवेळी भाजपकडून त्यांच्यासमोर किरण शेलार यांच्या रुपात सक्षम उमेदवार देण्यात आला होता. शेलार यांच्या विजयासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र त्यांची ही मेहनत व्यर्थ ठरली. दरम्यान शिवसेनेचे अनिल परब सुमारे २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. अनिल परब यांना ४४,७९१ तर किरण शेलार यांना १८,७७१ मते मिळाली. 

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे विजयी -
अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी दोन फेऱ्यांतच ५८ हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे तिसऱ्या फेरीतील मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच निरंजन डावखरे यांनी विजयासाठी आवश्यक मतं मिळवली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad