एक्स्प्रेस इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 July 2024

एक्स्प्रेस इंजिन जोडताना रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू


मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील रेल्वे यार्डमध्ये कोणार्क एक्सप्रेसला इंजिन जोडत असतांना दोन्ही डब्यामध्ये अडकून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सूरज सेठ असे या मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तो मध्य रेल्वेमध्ये पॉईंटमन या पदावर कार्यरत होता.

मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी यार्डमध्ये कोणार्क एक्सप्रेसच्या इंजिनला कपलिंग योग्य प्रकारे लागले नव्हते. त्यामुळे कपलिंगला सरळ करण्यासाठी पॉइंटसमन सूरज सेठ हे दोन डब्यामध्ये गेले. मात्र कपलिंग सरळ करत दोन कपलिंगच्यामध्ये सूरज अडकून गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

एक्सप्रेसला इंजिन जोडणी करताना सहाय्यक लोकोपायलट आणि शंटिंग सुपरवायझर यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र यावेळी हे दोघेही तिथे उपस्थित नसल्याने हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कपलींगच्या आव्हानात्मक कामाची जबाबदारी सर्रासपणे कर्मचाऱ्यांवर सोपवत अनुपस्थित राहिलेल्या सुपरवायझरवर मध्य रेल्वे प्रशासन कारवाई करावी अशी मागणी रेल्वे कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली जाईल, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेत रुजू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad