ठाणे / शहापूर - ऑनलाईन रमी गेम खेळल्यामुळे झटपट पैसे मिळतील या आशेने अनेक बेरोजगार तरुण या गेमकडे आकर्षित होतात. अशामध्ये शहापूरच्या खर्डी येथे राहणाऱ्या एका तरुणाने रमी गेममुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. नातेवाईकाकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या तगाद्यामुळे राहत्या घरी विष पिऊन या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी खर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून खर्डीमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होता. चंदन अमृतालाल बिंद (२७ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. चंदनला ऑनलाइन रमी गेमचे आकर्षण असल्याने त्याला झटपट श्रीमंत व्हायच होतं. त्याच्या या रमी गेम खेळण्याच्या नादात चंदनने उत्तरप्रदेश आणि इतर ठिकाणी असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींकडून ७ ते साडेसात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण त्याला या गेममध्ये पैसे कमावण्यात यश मिळाले नाही.
चंदनच्या नातेवाईकांनी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. नातेवाईकांकडून घेतलेले पैसे परत देण्यास चंदन अयशस्वी झाला. त्यामुळे तो नैराश्येत आला. त्याने २५ जुलै रोजी दुपारी खर्डी येथे नातेवाईकांच्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या वडिलांना फोन करून त्याने कर्जबाजारी झाल्याने मी विष प्यायलो असल्याचे सांगितले होते. चंदनच्या वडिलांना खर्डीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना फोन करून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करा असे सांगितले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment