मुंबई - सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ दोन सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्ती नंतर लोकसालसेवा पुन्हा सुरु करण्यात आली. दरम्यान ऐन गर्दीच्या वेळी सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ अनेक लोकल एकापाठोपाठ उभ्या राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ऑफिसवरून घराच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली. तर काही लोकल एकाच ठिकाणी उभ्या राहिल्यामुळे त्यामधील प्रवाशांना लोकलमध्ये ताटकळत बसावे लागले.
पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे यामुळे हाल झाले. ऑफिसला जाण्यासाठी उशिर झाल्यामुळे अनेकांना लेटमार्क लागला.
No comments:
Post a Comment