मुंबई - बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सध्याचा पदांचा आढावा घेवून विभागात पदांची आवश्यकता लक्षात घेवून पदभरती केली जाईल, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिले.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये प्रवाश्यांना अविरत परिवहन सेवा आणि अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची पदभरती करावी, असा प्रश्न नियम 92 अन्वये सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता लक्षात घेवून पदभरती करण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत बैठक घेवून योग्य तो निर्णय घेतला जाईल. निवृत्तीवेतनबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमुन यामध्ये विधान परिषद सदस्य प्रसाद लाड आणि सुनील शिंदे यांना सहभागी करुन घेतले जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनील शिंदे यांनी या सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment