दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्या - भीमराव आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2024

दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्या - भीमराव आंबेडकर



नागपूर - दीक्षाभूमी (Deekshabhoomi) यापुढे भारतीय बौद्ध महासभेची राहील, असा दावा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नातू भीमराव आंबेडकर (Bheemrao Ambedkar) यांनी केला आहे. दीक्षाभूमीच्या व्यवस्थापन सांभाळणारी विद्यमान स्मारक समिती गद्दार असून त्यांना एक मिनिटही समितीवर राहण्याचा अधिकार नाही. आंबेडकरी जनतेच्या न्यायालयाने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे व्यवस्थापन सांभाळणारी स्मारक समिती दीक्षाभूमीची मालक नसून आंबेडकरी जनता दीक्षाभूमीचे खरी मालक असल्याचे भीमराव आंबेडकर म्हणाले. 1 जुलै रोजी नागपूरातील दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज भीमराव आंबेडकर यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. त्यावेळी ते उपस्थित जनसमुदायासमोर बोलत होते.

दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळावी -
दीक्षाभूमीसाठी तत्कालीन आंबेडकरी नेते आणि रिपब्लिकन नेत्यांनी संघर्ष केल्यावरच 14 एकर जमीन मिळाली होती. तेव्हाच्या कागदपत्रांच्या नुसार ती 14 एकर जमीन भारतीय बौद्ध महासभेला मिळाली होती. 1960 मध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारतीय बौद्ध महासभेच्या दरम्यान झालेल्या कागदोपत्री व्यवहार आमच्याकडे उपलब्ध असून तो आम्ही प्रशासनाला सादर करणार आहोत. प्रशासनाने त्या संदर्भात सुनावणी घ्यावी आणि दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला द्यावी, अशी मागणी ही भीमराव आंबेडकर यांनी केली.

....म्हणून तेव्हा भारतीय बौद्ध महासभेला जमीन मिळू शकली नाही -
काही जुन्या राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळेच सरकारने देऊ केलेली जमीन तेव्हा भारतीय बौद्ध महासभेला मिळू शकली नव्हती. आज त्याच राजकीय नेत्यांचे मुलं दीक्षाभूमीचा कारभार सांभाळत असल्याची टीकाही भीमराव आंबेडकर यांनी गवई कुटुंबांचे नाव न घेता केली आहे. दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळावी, अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी कार्यकर्ते अन् आंबेडकरी जनतेने संघर्षासाठी तयार राहावं, असा इशारावजा आव्हानही भीमराव आंबेडकर यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad