मुंबईच्या गोरेगाव नेस्को येथे होणाऱ्या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी त्यांच्या हस्ते केली जाणार आहे. नवी मुंबई इथल्या गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.v
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तारकामाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात 5600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा प्रारंभ पंतप्रधान करतील. तसेच मुंबईत इंडियन न्यूजपेपर्स सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे पंतप्रधान करणार उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment