मुंबईची १० टक्के पाणीकपात रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2024

मुंबईची १० टक्के पाणीकपात रद्द


मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या साता धरणक्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. धरणात चांगला पाऊस झाल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत सात धरणात ६६.७७ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. 

या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad