विधानपरिषद निवडणुक चुरशीची होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2024

विधानपरिषद निवडणुक चुरशीची होणार


मुंबई - राज्याच्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होत आहे. परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीही अर्ज मागे घेतला नसल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. विधानपरिषदेसाठी महायुतीमधील भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत. शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गजे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, तर शेकापकडून जयंत प्रभाकर पाटील निवडणूक लढवत आहेत.

विधानसभेच्या २८८ पैकी काही आमदार लोकसभा निवडणूक जिंकले तर काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २७१ आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा आहे. भाजप १०५, शिंदे गट ३८ आणि अजित पवार गट ४० असे १८३ आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे काँग्रेस ३८, शिवसेना ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १० असे ६३ आमदार आहेत. हे संख्याबळ पाहता भाजपचे चार, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक असे एकूण ७ उमेदवार पहिल्या फेरीत जिंकू शकतील. तर दुसऱ्या फेरीची मते मिळवण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad