भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2024

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश


मुंबई - हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भुकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भुकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानी संदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad