MUNJYA - कोकणातील भुताने बॉक्स ऑफिसला झपाटले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2024

MUNJYA - कोकणातील भुताने बॉक्स ऑफिसला झपाटले


मुंबई - आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची मुख्य भूमिका असलेला कोकणी भुतावर आधारित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ने (MUNJYA) झोकात १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती, कोणताही मोठा चेहरा नसताना मुंज्याने चौथ्या आठवड्यातच १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.

बॉक्स ऑफिसवर (Box Office) कल्की २८९८ एडी चित्रपटाची लाट आलेली असतानादेखील मुंज्याने एका बाजूने आपली कमाई सुरू ठेवली आहे. ‘कल्की २८९८ एडी’मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र होते. मुंज्याने २० व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता ‘मुंज्या’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली.

‘मुंज्या’ने पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३५.३ कोटींचा व्यवसाय केला. दुस-या आठवड्यात ‘मुंज्या’ने ३२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या रिलीजला चौथा आठवडा पूर्ण करण्याआधी मुंज्याने १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर ‘मुंज्या’ने ११८.५१ कोटींची कमाई केली आहे. यंदाच्या वर्षात ज्या मोठ्या चित्रपटांना जमले नाही ते ‘मुंज्या’ने करून दाखवले आहे. 

या चित्रपटात कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही. त्याशिवाय, चित्रपटाचे मोठे बजेट नाही. मात्र, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगले कथानक यामुळे ‘मुंज्या’ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘मुंज्या’च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad