मुंबई - राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्यानंतर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी या उद्देशाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे १०० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने नुकतेच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थीनींना दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment