नागपूर - गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
नागपूर ग्रामीणमध्ये गेल्या २५ दिवसांत ७२ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपूर शहरात २५ दिवसांत ५६ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच नागपुरात लहान मुलांनाही साथीचे आजार होताना दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या ओपीडीची संख्या वाढली. तसेच मेडिकल, रुग्णालयातही रुग्णांची वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने लक्षणं दिसताच वेळीच उपचार घ्या, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment