मुंबई - मुंबई महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल. मुंबई महानगरपालिका हद्दीत अतिक्रमण मोहिमेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्याबरोबर अतिक्रमणांना पाठिंबा देणाऱ्यांवरही कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. झोपडपट्टीमध्ये तिसरा आणि चौथा माळा बांधला गेला असेल तर महानगरपालिकेतील आयएएस अधिकाऱ्यामार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल. (Action will be taken against encroachments)
मंत्री सामंत म्हणाले, महानगर पालिका क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असते. आचारसंहितेच्या काळात पोलिस मनुष्यबळ हे निवडणूक कामासाठी असल्याने तसेच महापालिका आणि इतर शासकीय कर्मचारी हे निवडणूक कामात असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम काही काळ थांबली होती. अतिक्रमण होत असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सदस्य अबू आझमी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य मिहिर कोटेचा, योगेश सागर, ॲड. आशिष शेलार, राम कदम आणि सुनील राणे यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment