मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत घाटकोपर येथील विद्याभवन शाळेचे (Vidyabhavn School) तब्बल 91 विद्यार्थी झळकले आहेत. यामुळे या विद्यार्थी आणि शाळेचे कौतुक केले जात आहे. (Highest 91 students of Vidya Bhavan in Merit List of Scholarship Exam)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-2024 रोजी घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( इ.8 वी ) परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या विद्याभवन शालेय संकुल, घाटकोपर मधील इयत्ता 5 वी चे 45 तर इयत्ता 8 वी चे 46 असे एकूण 91 विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यात इंग्रजी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता5 वी ) - 29 , पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) - 40, मराठी माध्यम ( सेमी इंग्रजी ) पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता5 वी) - 16 , पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) - 6 , मराठी माध्यमाचा इयत्ता 8 वी चा विद्यार्थी तन्मय अमित पळसकर याने 220 गुण मिळवून मुंबईत 7 वा तर ईश्वरी श्रीधर एरंडे हिने 218 गुण मिळवून मुंबईत 57 वी येण्याचा मान पटकावला आहे. तसेच इंग्रजी माध्यमाचा इयत्ता आठवीतील शुभम विजय शिंदे याने 196 गुण मिळवून मुंबईत 45 वा तर इयत्ता पाचवीतील लक्ष रमेश पाशकांती आणि कौस्तुभ संतोष नलावडे या दोघांनीही 214 गुण मिळवून मुंबईत 71वा येण्याचा मान पटकावला आहे. शाळेची गुणवत्ता व दर्जा कायम ठेवून संपूर्ण घाटकोपर विभागातून मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी विद्याभवन शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचे पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment