दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची पायाभरणी करण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. एकीकडे केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांकडून याला विरोध होत असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामि अविमुक्तेश्वरानंद यांनीही केदारनाथ मंदिर उभारण्यास विरोध केला आहे. त्यांनी केदारनाथ येथील मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. केदारनाथ मंदिरामधून २२८ किलो सोनं गायब झालं आहे, याचा हिशोब कोण देणार? असा आरोप शंकराचार्यांनी केला आहे.
याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा ते केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल, असा आरोप शंकराचार्यांनी केला.
मागच्या वर्षी केदरनाथ मंदिरातील एक वरिष्ठ पुजाऱ्याने केदारनाथ मंदिरामध्ये सोनाच्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळीचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता. याबाबत शंकराचार्य म्हणाले की, केदारनाथमध्ये २२८ किलो सोनं गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणताहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी दिल्लीमधील उत्तर पश्चिममध्ये असलेल्या हिरांकी परिसरात नव्या केदारनाथ मंदिराचं भूमीपूजन केलं. मात्र त्याला रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिरातील पूजाऱ्यांनी विरोध केला आहे.
No comments:
Post a Comment