मुंबई - जुहू, वर्सोवा बीचवर स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटाची मुदत ३ जून २०२४ रोजी संपुष्टात आली. कंत्राट संपुष्टात आल्याने या ठिकाणी स्वच्छतेसाठी कुठलीही यंत्रणा नाही. पालिका प्रशासन आपल्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता राखण्याचे काम करत आहे. पालिकेने १३० कोटींच्या निविदा मागवल्या आहेत; मात्र निविदा प्रक्रिया जलदगतीने राबवावी, जुहू, वर्सोवा बीचवर पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येत असून पालिकेने स्वतःच कायमस्वरूपी स्वच्छता राखावी, असे पत्र भाजप आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
जुहू, वर्सोवा बीचवर स्वच्छतेसाठी मार्चमध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र निविदाकाराने अंदाजित खर्चापेक्षा अधिकची बोली लावली होती. पालिकेने निविदाकारास अंदाजित रक्कम कमी करण्यास सांगितले, मात्र निविदाकाराने नकार दिला. त्यानंतर १९ जुलै २०२४ रोजी १३० कोटींच्या निविदा मागवल्या असून, पालिकेने कठोर अटी व पारदर्शकता सुनिश्चित करून विलंब न करता त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला. निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करत कंत्राटदाराची नियुक्ती केली पाहिजे, असे साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment