Mumbai News - वडाळ्यात भिंत कोसळून दोघींचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2024

Mumbai News - वडाळ्यात भिंत कोसळून दोघींचा मृत्यू



मुंबई - मुंबईत वडाळा येथील अँटॉप हिल परिसरातील कमला नगरमध्ये एक तीन मजली चाळीची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर भिंतीच्या ढिगा-यात काही जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. (Two dead in wall collapse)

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा येथील अँटॉप हिल परिसरातील कमला नगरमध्ये ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. बचाव करूया सुरु असताना दोन महिलांना जवळच्या सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे या दोघींचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शोभादेवी मौर्य (वय ४५) व झाकिरूनिसा शेख (वय ५०) अशी या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे अँटॉप हिल परिसरात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad