Yoga - योगासने करा आणि हृदयविकारापासून दूर रहा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2024

Yoga - योगासने करा आणि हृदयविकारापासून दूर रहा


मुंबई - कमी वयात हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. आयुष्यात झालेला बदल, कामांचे बदललेले स्वरूप आणि वेळा, खानपानाच्या सवयी यामुळे आपसूकच आपल्याला अनेक आजार होतात. यापैकी एका आहे हृदयविकार. हृदयविकारापासून लांब राहण्यासाठी रोज योगासने (Yoga) केली पाहिजेत.

काही योगासनांमुळे रक्ताभिसरण संस्थेचे कार्य सुधारते आणि त्यामुळे हृदय देखील अधिक कार्यक्षम होते. योगाचे आपल्या शरीराला होणारे फायदे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. यामुळे मनाला शांती तर मिळतेच पण योगा केल्याने आपलं शरीर देखील फ्लेक्सिबल आणि तंदुरुस्त राहतं. तसेच, शरीराच्या बाहेरील अवयवांप्रमाणेच शरीराच्या आतल्या भागांसाठी देखील योगा फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला हृदयाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी काही योगासनं सांगणार आहोत जी तुम्ही अगदी 30 मिनिटांत करू शकता. ही आसनं नेमकी कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

शरीराला स्ट्रेच करणे तसेच योगाभ्यासासाठी तयार करण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे. हे आसन अगदी वॉर्मअपसाठी केले जात असले तरी या आसनाचे शरीराला होणारे फायदे अनेक आहेत. हे आपल्या अ‍ॅब्सला टोन करण्यासाठी खूप फायदेशीर आसन आहे. योग अभ्यासकांच्या मते, ताडासन सगळ्या आसनांचे मूळ आसन आहे. हे आसन केवळ मसल्सवरच नाही तर पोश्चर सुधारण्यासाठीही मदत करते. तसेच शरीरात होणार्‍या वेदना कमी करण्यासाठीही हे उपयोगी आहे. हे आसन छातीच्या मसल्समध्ये तणाव निर्माण करून हार्ट पेशंटची रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. हे आसन हृदयाशी संबंधित आजाराशी लढायला मदत करते.

ताडासन (Tadasana / Mountain Pose) करण्याची पद्धत -
सर्वप्रथम ताठ उभे रहावे व दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवावे.
दोन्ही हात आपल्या शरीरापासून लांब ठेवावे.
मांडीचे स्नायू घट्ट करावे आणि खांदे सैल सोडावे.
पाठ सरळ ठेवावी. पायांच्या तळव्यांवर उभे राहण्याचा प्रयत्न करावा.
पोटाच्या खालच्या भागावर दाब देऊ नका. समोरच्या बाजूला बघावे.
हळू हळू मांड्याच्या आतल्या भागावर दाब निर्माण करावा.
कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करा.
श्वास आत घेत घेत खांदे, हात आणि छाती वरच्या बाजूला उचलण्याचा प्रयत्न करा.
डोक्यापासून पायापर्यंत शरीरामध्ये निर्माण होणारा ताण जाणवेल.
काही सेकंद याच स्थितीत रहा.
यानंतर श्वास हळू हळू सोडत पूर्वस्थितीत या.
हे करत असताना प्रत्येक कृती लक्ष केंद्रीत करुन शांतपणे करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad