मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2024

मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले


नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक प्रचारात घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. तर, नरेंद्र मोदींकडून शहजादे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं गेलं. मात्र, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नेते घराणेशाहीतून आलेले आहेत. स्वत: राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली, तसेच परिवार मंडल असे म्हणत राहुल गांधींनी भाजप व नरेंद्र मोदींवर टीका केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींसमवेत तब्बल 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून महाराष्ट्रातून 6 जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यात, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार आणि 3 राज्यमंत्रीपद मिळाली आहेत. त्यामध्ये, भाजप नेते नितीन गडकरी व पियुष गोयल हे पुन्हा एकदा मंत्री बनले असून रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. 

काँग्रेस हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे, घराणेशाही जगवायचं काम काँग्रेसकडून होतं. लांगुलचालन आणि घराणेशाहीवरुन मोदींनी अनेकदा राहुल गांधींना लक्ष्य केलं. मात्र, आता भाजपमध्येच कशी घराणेशाही आहे हे राहुल गांधींनी म्हटलं आहे. मोदी सरकारमध्ये नव्याने शपथ घेतलेले तब्बल 20 मंत्री आहेत, ज्यांना राजकीय वारसा आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील रक्षा खडसे आणि पियुष गोयल यांचेही नाव आहे. रक्षा खडसेंना मिळालेली मंत्रीपदाची संधी ही घराणेशाही असल्याचं स्वत: राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर, मंत्री पियुष गोयल यांचे वडिल वेद प्रकाश गोयल हेही मंत्री राहिले आहेत.

20 मंत्र्यांची नावे राहुल गांधींनी ट्विट केली -
एच.डी. कुमारस्वामी
ज्योतिरादित्य शिंदे
किरण रिजेजू
रक्षा खडसे
जयंत चौधरी
चिराग पासवान
जेपी नड्डा
कमलेश पासवान
रामनाथ ठाकूर,
राममोहन नायडू
जितीन प्रसादा
शंतनू ठाकूर
राव इंद्रजीत सिंग
पियुष गोयल
किर्ती वर्धन सिंग
विरेंद्रकुमार खाटीक
रवणीनत सिंग बिट्टू
धर्मेंद्र प्रधान
अनुप्रिया पटेल
अन्नपूर्णा देवी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad