नवी दिल्ली - विरोधी पक्ष सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करत होते, मात्र लोकसभा निवडणूकीच्या निकालांनी त्यांना शांत केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 'ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?' असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना डिवचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरून विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला.
राजधानी दिल्लीत आज एनडीए आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीतील सर्वच घटकपक्षांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तिसऱ्यांदा एनडीएचा घटकपक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार आहेत. जुन्या संसद भवनात आयोजित एनडीए आघाडीच्या नवनियुक्त खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना, "४ जूनला निकाल सुरु होता. मला अनेकांचे कॉल येत होते. मी म्हटलं, ते आकडे वगैरे राहूद्या...मला हे सांगा ईव्हीएम जिवंतआहे की मेलं? कारण या लोकांनी (विरोधी पक्ष) ठरवलं होतं की, भारतातील लोकशाही आणि लोकशाही प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडावा. सतत ईव्हीएमला शिव्या दिल्या जात होत्या. मला तर वाटत होतं ईव्हीएमची अंत्ययात्रा वगैरे काढतायत की काय? मात्र ४ जून येता येता त्यांच्या तोंडाल कुलूप लागलं. ईव्हीएमनं त्यांना गप्प केलं. हीच ताकद आहे भारतीय लोकशाहीची. हीच ताकद आहे भारताच्या निपक्षपातीपणाची..." असं मोदी म्हणाले.
देशाच्या 18 लोकसभा निवडणुकीसाठीचा निकाल 4 जून रोजी सर्वत्र जाहीर झाला. अब की बार, 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत (Election) बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, एनडीए आघाडीने 294 जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे.
No comments:
Post a Comment