Railway accident - मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक, १५ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2024

Railway accident - मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक, १५ जणांचा मृत्यू



पश्चिम बंगाल - पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झालाय. यात कंचनजंगा एक्सप्रेसमधील १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

आसाममधील सिलचर ते कोलकातामधील सियालदह दरम्यान धावणारी कंचनजंगा एक्स्प्रेस सियालदहला जात होती. न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्टेशनजवळ कंचनजंगा उभी असताना एका मालगाडीने तिला मागून धडक दिली, असे सब्यसाची डे, मुख्य जनसंपर्क अधिकारी- नॉर्थ फ्रंटीअर रेल्वे (NFR) यांनी सांगितले. कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कटिहार यांच्या म्हणण्यानुसार, १० ते १५ जणांचा मृत्यू होऊ शकतो.

ही धडक इतकी जोरदार होती की एक्सप्रेसचे दोन डब्बे एकमेकांवर चढले. तर, दोन ते तीन डबे रुळावरुन उतरले. धडक बसताच प्रवाशांचा एकच आरडाओरडा झाला. टक्कर झाल्यानंतर पॅसेंजर ट्रेनच्या किमान दोन बोगी रुळावरून घसरल्या. पर्यटकांचा हंगाम सुरू असल्याने ही ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरली होती.

"दार्जिलिंग जिल्ह्यातील दुःखद रेल्वे अपघाताविषयी जाणून धक्का बसला. जिल्हा दंडाधिकारी, डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे".
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री

"रेल्वे, एनडीआरएफ आणि SDRF च्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णलयात हलवण्यात येत आहे".
- अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad