संविधान बदलण्याच्या प्रचाराला इफेक्टिवली काऊंटर करु शकलो नाही - फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2024

संविधान बदलण्याच्या प्रचाराला इफेक्टिवली काऊंटर करु शकलो नाही - फडणवीस


मुंबई - आपली लढाई ही तीन पक्षांविरोधात नव्हती, त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हविरोधात होती, त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो. संविधान बदलणार, हा विषय इतका खालपर्यंत गेला. पण त्या मानाने आपण त्या प्रचाराला इफेक्टिव्हली काऊंटर करु शकलो नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Could not effectively counter the campaign to change the constitution)

भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना,  संविधान बदलणारच्या प्रचाराला इफेक्टिवली काऊंटर करु शकलो नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा चौथा टप्पा आला होता. त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात २४ जागांपैकी केवळ चार जागा आपण जिंकू शकलो असे फडणवीस म्हणाले.

‘तीन नव्हे तर आणखी एका चौथ्या पक्षामुळे महायुतीचा पराभव झाला’. आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो तर आपण चौथ्या पक्षाशीदेखील लढत होतो, तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं की, या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या हे लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरीता काम करत आहे, त्याला आपण रोखू शकलो नाहीत असे फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad