नवी दिल्ली - चिकनमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. असे मानले जातात. परंतु अलीकडील काही संशोधनात असेही समोर आले आहे की जे लोक हे सेवन करतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि त्यांच्यावर अँटीबायोटिक्सचा प्रभाव खूपच कमी होऊ शकतो. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएई) च्या प्रयोगशाळेतील संशोधनात असेही आढळून आले आहे की चिकनमध्ये ४० टक्के प्रतिजैविकांचे अवशेष असतात.
कोंबड्यांना वेगवेगळ्या रोगांपासून वाचवण्यासाठी किंवा त्यांना लवकर मोठे करण्यासाठी तसेच त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांना अँटीबायोटिक दिले जाते. त्यामुळे जर तुम्ही ते चिकन खाल्ले तर तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. कारण चिकनमधील अँटिबायोटिक्स तुमच्या शरीरात जातात. त्यानंतर त्याची आपल्या शरीराला सवय होते. पण जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते, तेव्हा त्याच्यावर अँटीबायोटिक्स लवकर काम करत नाहीत, त्यासाठी मग त्यांना जास्त डोस दिले जातात. जे शरीरासाठी हानिकारक असू शकतात.
शरीरावर अँटीबायोटीक्सचा भडीमार -
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देखील असा दावाही करण्यात आला आहे की, जगभरात कोविड-१९ महामारीच्या काळात देखील अँटिबायोटिक्सच्या अंदाधुंद वापर करण्यात आला. पण अनेकांवर तर आता अँटीबायोटीकचाच परिणामच होताना दिसत नाहीे. डब्ल्यूएचओच्या अहवालात देखील असे आढळून आले की सुमारे ७५ टक्के रुग्णांवर अँटीबायोटिक्सने उपचार केले जातात. पण जेव्हा ते काम करत नाही तेव्हा त्याची अधिक डोस द्यावा लागतो. पण एक वेळ अशी येते की शरीर देखील त्याला प्रतिसाद देणे बंद करुन टाकतात.
आफ्रिकन प्रदेशात परिणाम अधिक -
कोविड-१९ महामारीच्या काळात अँटिबायोटिकचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. पूर्व भूमध्य आणि आफ्रिकन प्रदेशात तो ८३ टक्क्यांनी वाढला तर पश्चिम पॅसिफिक प्रदेशात तो ३३ टक्क्यांनी वाढला. गंभीर कोविड-१९ झालेल्या लोकांना अँटिबायोटिक वापराचे सर्वाधिक डोस देण्यात आले.
अनावश्यक वापर वाढला -
जेव्हा एखाद्या रुग्णाला अँटिबायोटिकची गरज असते, तेव्हा त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच असतात. जेव्हा अनावश्यक पण त्याचा वापर होतो तेव्हा ते धोके निर्माण करतात. जानेवारी २०२० ते मार्च २०२३ दरम्यान ६५ देशांमधील रूग्णालयात दाखल झालेल्या ४,५०,००० रूग्णांच्या डेटावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment