उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टने प्रवास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2024

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टने प्रवास


मुंबई - राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टने जाण्यासाठी आले असता, देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टसमोर गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी तळमजला ते तिस-या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला. 

दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले असता तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना ब-याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अनिल परब यांचे अ‍ॅडव्हान्समध्ये अभिनंदन करत आहोत असे सांगत सर्वांच्या नजरा वळवल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad