Mumbai News - डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2024

Mumbai News - डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू



मुंबई - मुंबईत मोठ्या प्रमाणात एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. ती नष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू असून राज्यभरात डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती. (Proceedings for dengue preventive measures) (Mumbai News)

मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंगूने झाले होते यंदा डेंगूने एकही मृत्यूची नोंद नाही. डेंगू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा ४३,४२८ एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणी देखील केली आहे. तसेच डेंगूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो. यासाठी राज्याचा सार्वजनिक विभागही डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. त्याअनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास केली. यावर स्थानिक प्रशासनास उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad