मुंबई - रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामांसाठी उद्या (23 / 6 / 2024) मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्ग, सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी/वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. (Mega Block Update)
मध्य रेल्वेवर उद्या सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच सीएसएमटी चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान ब्लॉक घेतला आहे.
No comments:
Post a Comment