डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीला आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2024

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीला आग



मुंबई - डोंबिवली पुन्हा हादरली असून येथील एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, आगीचे लोट दूरपर्यंत पसरले असून, शेजारील कंपन्यांनाही आगीने कवेत घेतले आहे. यासोबतच आग लागलेल्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Fire in Dombivli MIDC)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील फेज २ एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आज सकाळी आग लागली आहे. आग लागलेल्या कंपनीच्या शेजारी अभिनव शाळा आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच येथील एका कंपनीला आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा ही दुर्घटना घडल्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बचाव पथकाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, आग लागलेल्या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या कंपनीतील कामगारांना आणि स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad