बीआयटी वसाहतीत बाबासाहेबांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारा, भाजपची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2024

बीआयटी वसाहतीत बाबासाहेबांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारा, भाजपची मागणी



मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना देण्यात आले. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे साक्षी दरेकर, भरत घोलप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Construct a gate in the name of Babasaheb Ambedkar)(Mumbai News)

परळ विभागात बीआयटी वसाहत असून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१२ ते १९३२ या कालावधीत आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास होते. त्यांनी या ठिकाणाहून सामाजिक चळवळीला सुरुवात केली होती. त्यामुळे ही वास्तु पाहण्यासाठी देश- विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक तसेच अनुयायी येत असतात. परंतु त्या वास्तू पर्यंत पोहचण्यासाठी लोकांना अडचण होते. त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक तसेच कमान नाही. त्यामुळे पर्यटक तसेच अनुयायींना अडचणींना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी बीआयटी वसाहतीच्या दोन्ही बाजूला म्हणजेच परेल ब्रीजच्या बाजूस विठ्ठल चव्हाण मार्ग या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे तसेच प्रभादेवी परेल स्थानक येथून येणाऱ्या मार्गावर सुभाष डांबरे रोड या ठिकाणी माता रमाई यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा शिष्टमंडळाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad