मुंबई - चेंबूर गिडवाणी मार्ग येथे एका चाळीत सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 9 जण जखमी झाले आहेत. या जखमींना गोवंडी येथील शताब्दी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीत जखमी झालेल्या 9 पैकी 8 जण एकाच कुटुंबातील आहेत. (Mumbai Fire) (Cylinder Blast)
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर गिडवाणी मार्ग येथील गोल्फ क्लब जवळ स्मोक हील सलूनच्या मागील बाजूस आज पहाटे एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे घरातील वायरिंग तसेच इतर वस्तूंना आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 7.37 वाजता लागलेल्या या आगीवर 8.08 वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीमध्ये घरामधील इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी सामान जळून खाक झाले आहे.
9 जण जखमी -
मुंबई अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवताना घटनास्थळावरून भाजलेल्या 9 जणांना बाहेर काढून गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी एक सुदाम शिरसाट वय 55 वर्षे यांच्या डोके आणि पायाला मार लागला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे -
शताब्दी रुग्णालय -
ओम लिंबाजिया 9 वर्ष
अजय लिंबाजिया 33 वर्ष
पूनम लिंबाजिया 35 वर्ष
महेक लिंबाजिया 11 वर्ष
ज्योत्सना लिंबाजिया 53 वर्ष
पीयूष लिंबाजिया 25 वर्ष
नितीन लिंबाजिया 55 वर्ष
प्रिती लिंबाजिया 35 वर्ष
सायन रुग्णालय -
सुदाम शिरसाट 55 वर्ष
No comments:
Post a Comment